जन्मो जन्मी आम्ही बहू पुण्य केले ॥ तेव्हा या सद्गुरुनाथे कृपा केली ॥

जन्मो जन्मीच्या फेर्यात आपण फक्त रांगतच राहिलो मात्र आता त्या सद्गुरुंनी कृपा केली आणि आपल्या हाताला धरुन उभे केले. मानव जन्म देऊन या जन्म मृत्यूच्या फेर्यातून मुक्ती मिळविण्याची एक संधी परमेश्वराने आपल्याला दिली आहे. ती वाया न घालवता प्रत्येक मानव जीवाचे सार्थक करुन मोक्षाचा मार्ग मिळावा हेच उद्धिष्ट समोर ठेऊन या सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली.

हिंंदू संस्कृतीचे जतन करुन प्रत्येक भक्ताकरवी सामुदायीक रीत्या जप, श्री स्वामी समर्थ हरीपाठ तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे सामुदायीक पारायण या केंद्रातून करवून घेतले जाते. त्यामुळे भक्त्ती रसाचे हे ज्ञानामृत प्रत्येक भक्ताच्या रोम रोमातून पाझरुन लागते. तसेच संसाराच्या जाळ्यात अडकून निराश व त्रस्त झालेली व्यक्ती आनंदी व प्रसन्न होउन जीवनाची वाट तिला लख्ख दिसू लागते.

पुढे स्वामी समर्थ प्रगट दिनादिवशी सकाळी दादर मठामध्ये स्वामींचे दर्शन करून घरी यायचे व स्वामी चरित्राचे पाराथ करून शिरा प्रसाद म्हणुन बनवून वाटायचा. 19 डिसेंबर 1993 रोजी लग्न झाले. तीला स्वामीबद्दल एवढी आस्ता नव्हती. मात्र महालक्ष्मी पोथी रोज वाचायची. 1994 मध्ये लग्नानंतर आमची पहिली स्वामी जयंती आम्ही नेहमी प्रमाणे पहाटे 5.30 वाजता मठामध्ये दर्शन करून सकाळी 7.00 वाजता घरी आलो. मी स्वामी चरित्र पारायणाला बसलो आणि का कोणास ठाऊक माझी पत्नी अर्चना हिला आरतीसाठी आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणुन जेवणच वाढु अशी इच्छा झाली. आणि तीने वरण भात व भाजीचा प्रसाद बनविला. असे दोन तीन वर्षे चालले. नंतर मिहीर शिंदे, रेश्मा सावंत, मनिषा शिंदे, अजय सुखसे, हेमंत धुळे, मनिषा धुळे, प्रबोध धुळे, मयुरी सागवेकर असे आठ-दहा भक्त माझ्या सोबत पारायणाला बसले. व स्वामी जयंतीला सामुदायिक पारायणाला सुरूवात झाली.

श्री.काटकर महाराजांना नमस्कार करताच त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. त्याचा कृपा-स्पर्श होताच देहभान विसरूनच गेलो. अंगात वेगळीच उष्णता आल्यासारखे वाटले. मला काहीच समजेना महाराज म्हणाले. आपण 1000 वर्षापूर्वी एकत्र होतो. त्यानंतर आज भेट झाली. यापुढे हजारों लोकाचं भवितव्य तुझ्यावर अवलंबुन आहे. त्यांना तुला घडवायच आहे. तुझ्यावर त्यांची जबाबदारी आहे. मला त्याच्या बोलण्याचा तीळ मात्र ही अर्थ लागला नव्हता. पहीलीच भेट होती. माझी त्यांची ओळखही नव्हती. त्यामुळे मी गप्पच राहीलो. मात्र तेथुन निघाल्यापासुन मी त्याच्या बोलांचेच चिंतन करू लागलो. असे का बोलले असतील माझ्यावर कोणती जबाबदारी असेल काहीही असो स्वामी वाहुन घेतील आपण स्वामी सेवा करायची स्वामी मार्ग देतील त्यांना आवडेल. त्या मार्गाने चालायचे. असा विचार करताना पुन्हा स्वप्न दृष्टांतातील स्वामींचे वाक्य पुन्हा आठवले. तु जन सेवा कर दुसर्याचे दुःख ओळख स्वामीनीच काटकर महाराजा करवी माझ्या जीवनाचा उलघडा केला असावा. आता हा देह जनसेवेत व्हायचा असा निश्चय करून पुढे जन सेवा हीच आपली स्वामी सेवा म्हणुन कार्यरत झालो.

स्वामी सेवा करत असताना स्वामी भक्त श्री.अनिल सांवत (साई समर्थ डेव्हलपर्स) यांची ओळख झाली. त्यांच्या सहवासात असताना बर्याच स्वामी भक्तांची ओळख तर झालीच शिवाय पू.पूज्य संत श्री.दांडेकर गुरूजी यांचीही भेट झाली व त्याचाही कृपाशीर्वाद लाभला. या सर्वांच्या आशिर्वादाने श्री स्वामीच्या कृपेने व असंख्य स्वामीभक्ताच्या सहकार्याने श्री दत्त स्वामी सेवा केंद्राची स्थापना झाली.

केंद्रात सर्व भक्तांकडुन सामुदायिक नामस्मरण केले जाऊ लागले. भक्तांना स्वामींची प्रचिती येऊ लागली. भक्तांची गर्दीही वाढु लागली. 10ु15 चे राहते घर जागा अपुरी पडु लागली. स्वामींच्या कृपेने व श्री. जनार्दन चव्हाण याच्या सहकार्याने आरे कॉलनी छोटा काश्मिर गोरेगाव येथे घर घेतले. एका स्वतंत्र्य खोलीमध्ये देवघराची रचना केली. पुढे स्वामीची मुर्ति स्थापना करावी अशी इच्छा झाली. भक्तांची इच्छा ही स्वामीची प्रेरणा म्हणुन मा.सुनिल प्रभु त्यांचे मित्र परिवार व केंद्रातील सर्व स्वामी भक्त यांच्या सहकार्याने केंद्रामध्ये स्वामीची पंचधातुची मुर्ति स्थापन करून केंद्राचे रूपांतर श्री स्वामी समर्थ मठामध्ये झाले आहे.

मा.आमदार श्री.रविंद्र वायकर साहेब हे मठामध्ये दर्शनासाठी आले असता स्वामींची प्रेरणा होताच मठाच्या बाहेरील आवारात 3 फुट उंचीची संरक्षण भिंत, ग्रील व संपूर्ण आवारात शेड व लादी बसवुन भक्तांची होणारी गैरसोय दूर केली आहे. तसेच श्री. अनिल सावंत साहेब यांनी ही मठामध्से मार्बल व लादी बसवुन मठाची शोभा व प्रसन्नता वाढवीण्याची स्वामी सेवा केली आहे. या सर्वांचे आम्ही ॠणी आहोत. स्वामी सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी राहोत.

जसा चंद्र कलेकलेने वाढत जातो. तशीच या केंद्राची कलेकलेने उन्नती होत गेली. हजारो स्वामी भक्त मठात येऊ लागले. मा.श्री.सतीश काळे (पुणे) यांनी लिहिलेले श्री अक्कलकोट स्वामी हरीपाठ याचे सामुदायिक पाठ व आरती दर गुरूवारी रात्री 08.00 ते 09.30 यावेळेत केले जातात. शेकडो भक्तजन या नामस्मरणाचा लाभ घेतात. तसेच या सर्व भक्ताच्या सहकार्याने मठात वेगवेगळे कार्यक्रम व सेवा राबवली जाते. जेणेकरून सर्वांच्या हस्ते जनसेवा तर होतेच शिवाय आनंद व मानसिक समाधानासारखे अमुल्य सुख ही लाभते व हिंदु संस्कृती ही जतन केली जाते.

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥